दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा

December 13, 2013 10:52 PM0 commentsViews: 1796

aap and congress13 डिसेंबर : दिल्लीत सरकार स्थापनेत भाजपने माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसने आम आदमीकडे ‘हात’पुढे केलाय. सरकार स्थापनेसाठी आपला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असल्याचं पत्र काँग्रेसनं नायब राज्यपाल नजीब जंग यांना दिलंय. जर काँग्रेस जनलोकपालला पाठिंबा देणार असेल तर आम आदमी पार्टी काँग्रेसचा पाठिंबा घ्यायला तयार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. उद्या सकाळी अरविंद केजरीवाल नायब राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे जनलोकपालच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र येण्याची शक्यता आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पार ‘सफाया’ झाला. दिल्लीत 70 जागांसाठी घेण्यात आलेल्या विधासभेच्या निवडणुकीत भाजपने 32 जागा पटकावल्यात तर आम आदमीने 28 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने 8 तर इतर अपक्ष पक्षाने 2 जागा मिळवल्या आहे. पण बहुमतासाठी 36 चा आकडा भाजपला गाठता आला नाही. आम आदमी अगोदरच भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलं.

त्यामुळे भाजपपुढे सरकार स्थापन करावे तरी कसे असा प्रश्न उभा होता. अखेरीस सरकार स्थापनेच्या शर्यतीतून भाजपने माघारी घेतलीय. भाजप नेते हर्ष वर्धन यांनी गुरुवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली आणि बहुमत सिद्ध करण्यात असहमत असल्याचं सांगितलं. दिल्लीच्या जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत. सरकार स्थापन करु शकलो नाही तरी विरोधी बाकावर बसून दिल्लीकरांची सेवा करु असं वर्धन यांनी स्पष्ट केलं. यानंतर नायब राज्यपालांनी आम आदमी पार्टीलाही चर्चेचं निमंत्रण दिलं. त्यानुसार आपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर आपची बैठकीही झाली पण कोणताही निर्णय झाला नाही.

अखेर संध्याकाळी काँग्रेसने आम आदमीला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं पत्र राज्यपालांना दिलं. जर काँग्रेस जनलोकपालला पाठिंबा देणार असले तर आम आदमी पार्टी काँग्रेसचा पाठिंबा घ्यायला तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर काँग्रेसचा पाठिंबा घेतला तर काँग्रेसच्या 8 जागा आणि आम आदमीच्या 28 जागा मिळून बहुमताचा 36चा आकडा पूर्ण होतो. त्यामुळे आपला सरकार स्थापन करता येईल. पण ज्या जनआंदोलनातून आम आदमी पक्ष स्थापन झाल्या त्यांच्या निशाण्यावर काँग्रेस हा पक्ष होता हे सर्वश्रुत्र आहे. त्यामुळे ‘आप’ काँग्रेसशी हातमिळवणी करेल का असा प्रश्न निर्माण झालाय. काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्यानंतर देशभरातील आप समर्थकांनी नाराजी व्यक्त केलीय. आता उद्या केजरीवाल राज्यपालांची भेट घेणार असून काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.

close