फिल्म रिव्ह्यु : जॅकपॉट !

December 13, 2013 11:17 PM0 commentsViews: 2503

अमोल परचुरे, समीक्षक

जॅकपॉट…नावावरुनच लक्षात येतं की, यात पैशांचा खेळ असणार आहे, तसंच आहे. ‘जॅकपॉट’मधलं प्रत्येक कॅरेक्टर हे पैशांमागे धावतंय. ही सगळी पात्रा ‘सबसे बडा रुपय्या’ असं म्हणत एकमेकांवर कुरघोडी करत असतात. ‘बॉम्बे बॉईज’ आणि ‘बूम’सारख्या सिनेमांमध्ये कैझाद गुस्ताद या दिग्दर्शकाची वेगळी वाट दिसली होतीच. आता दहा वर्षांनंतर तो ‘जॅकपॉट’ घेऊन आलाय. वेगवान सिनेमांची आवड असेल तर तुमच्यासाठी ‘जॅकपॉट’ एक बर्‍यापैकी पर्याय ठरु शकतो. ‘जॅकपॉट’ सिनेमाचं डयूरेशन कमी आहे ही त्यातल्या त्यात आणखी एक दिलासा देणारी गोष्ट…कारण सिनेमा आवडला नाही तर भरपूर वेळ वाया गेल्याचं दु:खही होणार नाही.

काय आहे स्टोरी?
jacpot
जॅकपॉट हा सिनेमा घडतो गोव्यामध्ये…सिनेमात ‘जॅकपॉट’ याच नावाची कॅसिनो बोट आहे. हा कॅसिनो लुटायला काही चोरांची टोळी आलीये. सगळं काही प्लॅनप्रमाणे सुरु आहे. पण जेव्हा माया (सनी लिओने) आणि फ्रान्सिसची एंट्री होते तेव्हा प्लॅन फसायला लागतो. कॅसिनोचा मॅनेजर ज्याला सगळे बॉस म्हणतात, त्याचंही या सगळ्यावर नीट लक्ष आहे आणि तो अतिशय धूर्तपणे आपल्या चाली खेळतोय. तसं तर सगळेच चाली खेळतायत, त्यामुळे कोण कोणावर मात करणार, जॅकपॉट कोणाला लागणार याची उत्तरं शोधत आणि एकदा हा हिरो तर एकदा तो व्हिलन असा आलटून पालटून घडणारा खेळ आपल्याला बघायला लागतो.

नवीन काय?
Sunny-Leone-in1..
निर्माता दिग्दर्शकांसाठी सिनेमाचा सेलिंग पॉईट आहे अर्थातच सनी लिओने, त्यामुळे कथा कितीही वेगवान असली तरी सनी आणि सचिन जोशीचा रोमान्स आहेच.. सनी लिओनेचे बोल्ड सीन्स प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करतील याच बेताने सगळी रचना सिनेमात करण्यात आलीये. बाकी तसं सिनेमात नवीन काहीच नाही.. स्टोरीमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स असले तरी त्यात फार धक्कादायक वगैरे फारसं नाही. त्यातल्या त्यात नसिरुद्दीन शाह यांचे वन लाईन डायलॉग्ज थोडं मनोरंजन करतात. तोशी आणि शारिब यांची गाणीसुद्धा जमून आलीयेत, पण या सगळ्या गोष्टी सिनेमा तारु शकत नाहीत. थोडक्यात थ्रिलर, सस्पेन्स, रोमान्स, असं सगळंच बघायचं असेल तर मग जॅकपॉट बघू शकता..

रेटिंग : जॅकपॉट – 40

close