मुंबईत अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचा खून

February 17, 2009 7:44 AM0 commentsViews: 1

17 फेब्रुवारी मुंबईमुंबईत बारावीत शिकणा-या विद्यार्थ्याला त्याच्या मित्रांनी किडनॅप करून ठार मारल्याची घटना घडली. खार इथं हा प्रकार घडला आहे. रिझवी कॉलेजमध्ये शिकणा-या मुकीम खान या विद्यार्थ्याला 13 फेब्रुवारीला किडनॅप करण्यात आलं होतं. खंडणीसाठी हा प्रकार घडला होता. त्याच्या आईवडिलांनी खार पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यानंतर मुकीमचा मृतदेह पोलिसांना सोमवारी दुपारी सापडला. हा मृतदेह वांद्रे इथल्या मिठी नदी काठच्या जंगलात फेकून दिला होता. मुकीमला त्याच्या कॉलेजमधल्या दोन मित्रांनीच किडनॅप केलं होतं असं पोलीस तपासात उघड झालंय. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुकीमला का किडनॅप केलं गेलं याचा तपास पोलीस करत आहेत.

close