अण्णांसोबत आता किरण बेदींचंही उपोषण सुरु

December 14, 2013 4:09 PM0 commentsViews: 622

keran bedi 4414 डिसेंबर : लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. अण्णांना पाठिंबा देत माजी सहकारी किरण बेदींनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

अण्णांच्या आंदोलनाच्या या नव्या पर्वात आता नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायला सुरुवात केली आहे. अण्णांच्या समर्थनार्थ अनेक राज्यांतून आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतूनही लोकांची गर्दी वाढतेय. अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज पारनेर तालुका बंद ठेवण्यात आला आहे.

अण्णांचं उपोषण सुरु झाल्यापासून राळेगणसिद्धीचे रहिवासी, शाळकरी मुलं दररोज अभिनव पद्धतीची आंदोलनं करत आहे. आज शनिवारी संध्याकाळी राळेगणमध्ये जनलोकपालाच्या मागणीसाठी बोंबाबोंब मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, आज दुपारी आरपीआय नेते रामदास आठवलेही अण्णांची भेट घेणार आहेत.

close