केम्प्स कॉर्नरवरील भीषण आगीत 7 जण मुत्युमुखी

December 14, 2013 2:41 PM0 commentsViews: 281

kems corner fire14 डिसेंबर : दक्षिण मुंबईतील केम्प्स कॉर्नर भागातील ‘माऊंट प्लांट’ या बिल्डिंगच्या बाराव्या मजल्याला लागलेल्या आगीत 7 जण मृत्यूमुखी पडलेत. शुक्रवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास या इमारतीच्या 12 व्या मजल्यावर ही आग लागली होती. आज दुपारी बचावकार्य संपलंय.

शुक्रवारी संध्याकाळी ‘माऊंट प्लांट’ या इमारतीच्या 12 व्या मजल्यांला आग लागली होती. रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती कळवली. मात्र अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचण्याअगोदर आगीने रौद्ररुप धारण केलं. 12 व्या मजल्याला लागलेली आग 13 व्या आणि 14 व्या मजल्यावरही पोहचली.

त्यामुळे अनेक रहिवासी अडकले होते. काही मिनिटात अग्निशमन दलाच्या 14 गाड्या, 5 रुग्ण वाहिका आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या 14 गाड्यांच्या साह्यांनी शनिवार सकाळपर्यंत आग विझवण्याचं कार्य सुरू होतं. दुपारपर्यंत अग्निशमन दलांच्या जवानांना परिस्थिती पूर्ववत आणण्यात यश आलं. या आगीत सात जणांचा मृत्यू झालाय मात्र आगची कारण अजूनही कळू शकले नाही.

close