खोब्रागडेंवर कारवाई, अमेरिकेच्या राजदूतांकडे भारताची तीव्र नाराजी

December 14, 2013 2:10 PM0 commentsViews: 686

devayani khobragade14 डिसेंबर : अमेरिकेतील भारताच्या वकिलातील उच्चपदस्थ महिला अधिकारी असलेल्या देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेसंदर्भात भारतानं अमेरिकन राजदूतांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकन राजदूत नॅन्सी पॉवेल यांच्याकडे तीव्र शब्दात सरकारनं ही नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या घटनेविषयी देवयानी खोब्रागडे यांचे वडील आणि माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनीही देवयानीवरच्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. ही एक प्रकारची छळवणूक असल्याचा आरोप उत्तम खोब्रागडे यांनी केला आहे.

आपल्या घरातल्या बाईसाठी व्हिसा मिळवताना कागदपत्रात फेरफार केल्याचा देवयानी खोब्रागडे यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती आणि जामीनावर सुटका केली.

close