बीसीसीआयच्या वकिलांकडून कपिलचा अपमान

February 17, 2009 7:51 AM0 commentsViews: 3

17 फेब्रुवारीइंडियन क्रिकेट लीगवर बीसीसीआयचा असलेला राग सगळ्यांनाच माहीत आहे. आणि वेळोवेळी याचा फटका आयसीएलशी संबंधित क्रिकेटर्सनाही बसला. आता नवीन एक प्रकरण उघड झालंय ते आयसीएलचे अध्यक्ष आणि भारताचा महान ऑलराऊंडर खेळाडू कपिल देवबाबत.आयसीएलशी संबंधित खेळाडूंचं पेन्शन बीसीसीआयने रोखलं. त्याविरुद्ध कपिलने दिल्ली उच्च न्यायालयात अपील केलं होतं. या केसच्या उलट तपासणीमध्ये बीसीसीआयच्या वकिलांनी कपिलला काही अपमानास्पद प्रश्न विचारल्याचं उघड झालं आहे. कपिलने सर्वाधिक टेस्ट विकेट्सचा रिचर्ड हॅडलीचा रेकॉर्ड मोडल्यावर बीसीसीआयने त्याला 4लाख 31 हजार रुपयांचं बक्षिस जाहीर केलं होतं. शिवाय गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेचा खर्च केला होता. त्याचे दाखले देत बीसीसीआयने कपिलवर उपकारच केल्याची भाषा वकिलांनी केली आहे.

close