लोकपाल विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा

December 14, 2013 7:03 PM1 commentViews: 514

rahul gandhi delhi pc3114 डिसेंबर : चार राज्यातल्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष खडबडून जागा झालेला दिसतोय. लोकपाल विधेयक राज्यसभेत लवकर मंजूर होईल असा विश्वास काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केला. काँग्रेस भ्रष्टाचाराशी लढाण्यासाठी नवं शस्त्र देशाला देऊ पाहतंय आणि लोकपाल विधेयकाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे असंही राहुल यांनी स्पष्ट केलं.

तर या विधेयकातला कळीचा मुद्दा असलेला सीबीआयच्या मुद्दावरही काँग्रेसने मवाळ भूमिका घेतली. सीबीआय लोकपालच्या कक्षेत काम करणार असल्याचं कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितलं. काही पक्षांना लोकपाल विधेयकातल्या फक्त काही तरतुदींवर आक्षेप आहेत असा दावा अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.

जर अण्णा उपोषणाला बसले असतील तर तो त्यांचा दृष्टिकोन आहे, आमचं काम हा कायदा आणणं आहे असंही राहुल यांनी सांगत काँग्रेसची बाजू सावरली. शनिवारी संध्याकाळी लोकपाल विधेयकावर दिल्लीत पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी राहुल गांधी यांच्यासह पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, अजय माकन असे काँग्रेसचे दिग्गज हजर होते.

  • prashik

    Ab aaya na Unth pahad ke niche

close