औषध विक्रेत्यांची 16 डिसेंबरला बंदची हाक

December 14, 2013 5:35 PM0 commentsViews: 365

Image img_208752_medicalstore_240x180.jpg14 डिसेंबर : राज्यातील औषध विक्रेते आणि प्रशासनात पुन्हा वाद निर्माण झालाय. यामुळे केमिस्ट आणि डग्रिस्ट असोसिएशननं पुन्हा एकदा बंदच हत्यार उपसलंय. 16 ते 18 डिसेंबर रोजी औषध विक्रेत्यांनी बंदची हाक दिली.

राज्यातल्या औषध विक्रेत्यांनी एकाच वर्षात चौथ्यांदा बंदची हाक दिलीये. दुकानांमध्ये फार्मासिस्टची नेमणूक करणे, औषधांची बिलं देणं आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं न देणं अशी बंधनं घालण्यात आली आहे.

यातून राज्यात सुमारे दहा हजारांच्या वर औषध दुकांनांवर कारवाई करण्यात आली. त्यातील अनेक औषध विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आलेत.

औषध विक्रेत्यांची भूमिका

 • राज्यात क्रास प्रक्टीसचं प्रमाण अधिक
 • अनेक आयुर्वेदीक, युनानी डॉक्टर ऍलोपॅथी औषधी लिहून देत नाही.
 • सर्वच औषधांच बिलं देऊ शकत नाही
 • ग्रामीण भागात कॉम्प्युटर बिल देणं अशक्य.
 • जागेवर कारवाईकरुन परावाना रद्द करणं बेकायदेशीर
 • डॉक्टर आणि हॉस्पिटल बेकायदेशीर औषध साठा करतात

प्रशासनाची भूमिका

 • फार्मासिस्ट नसेल तर चुकीचं औषध दिलं जाऊ शकतं
 • त्यामुळे असा प्रकार रुग्णांच्या प्राणावर बेततं
 • सर्वोच्च न्यायालयनं बिलं द्यावं बंधन घालून दिलंय
 • बिलांमुळे नकली औषधांची विक्री थांबेल
 • ग्राहकांना योग्य न्याय मिळू शकेल.

 

close