अलविदा मडिबा

December 15, 2013 1:13 PM0 commentsViews: 475

15 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला आज चिरविश्रांती घेणार आहेत. ईस्टर्न केप प्रॉव्हिन्समधल्या कुनू या मूळ गावी त्यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव ठेवलेले कॉफीन मार्क्यु, म्हणजेच तिथल्या पारंपरिक मोठ्या तंबूत ठेवण्यात आले आहे.

मंडेला ज्या खोसा समुदायाचे होते, त्या समुदायाच्या परंपरेप्रमाणे हे अंत्यविधी होत आहेत. कालच त्यांचे पार्थिव ईस्टर्न केप प्रॉव्हिन्समधल्या कुनू या गावी आणण्यात आले. लोकांनी गाणी गाऊन त्यांच्या पार्थिवाचे स्वागत केले. मंडेलांच्या निधनानंतर दक्षिण आफ्रिकेतली जनता त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून त्यांचं आयुष्य सेलिब्रेट करत आहे.

जगभरातले साडेचार हजार नेते यासाठी उपस्थित आहेत. मंडेला यांचे जुने मित्र आर्चबिशप डेसमंड टुटू आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन हेही उपस्थित आहेत. त्याशिवाय हजारो दक्षिण आफ्रिकी नागरिक लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जमले आहेत. प्रार्थना, आठवणी यांनी वातावरण धीरगंभीर झालंय. यानंतर मंडेलांच्या जवळच्या साडेचारशे लोकांच्या साक्षीने त्यांच्या पार्थिवाचं दफन केलं जाणार आहे.

मंडेला यांचा जीवनप्रवास

नेल्सन मंडेला यांच्या जाण्याने एका महान पर्वाचा अंत झाला. दुर्दम्य आत्मविश्वास आणि संघर्षाचे प्रतीक म्हणजे नेल्सन मंडेला. चार दशकांच्या प्रखर लढ्यानंतर नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेतली वर्णद्वेषी राजवट संपुष्टात आणली आणि नवा इतिहास निर्माण केला.

दक्षिण आफ्रिकेतल्या कुनू इथे 18 जुलै 1918 ला नेल्सन मंडेला यांचा जन्म झाला. मंडेला यांचे वडील एका आदिवासी जमातीचे प्रमुख. लहानपणापासूनच मंडेलांना संघर्ष करण्याचे आणि लढण्याचे शिक्षण मिळाले पण सुरुवातीचा काही काळ वगळता संपूर्ण लढा त्यांनी अहिंसेच्या मार्गानेच पुढे नेला. नेल्सन मंडेलांच्या लढ्याची प्रेरणा होते ते महात्मा गांधी. आफ्रिकेतल्या वास्तव्यातच गांधीजींनी कृष्णवर्णीयांवर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला. इथूनच प्रेरणा घेऊन नेल्सन मंडेला शेवटपर्यंत लढत राहिले.

तब्बल 27 वर्षांचा जीवघेणा तुरुंगवास, सततचा संघर्ष आणि गोर्‍या राजवटीचा जुलूम, हे सर्व असूनही मंडेला कधी निराश झाले नाहीत म्हणूनच ‘स्ट्रगल इज माय लाईफ’ असं ते नेहमी म्हणायचे. जागतिक आणि स्थानिक दबाव ओळखून गोर्‍या राजवटीने नेल्सन मंडेलांना 1990 मध्ये तुरुंगातून मुक्त करत निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकीत मंडेला विजयी झाले आणि ते आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले.

अध्यक्ष झाल्यावर त्यांनी गोर्‍या लोकांविरुद्ध मनात कटुतेची भावना ठेवली नाही. त्यांनाही सत्तेत सहभागी करून आपल्यातल्या मानवतेचं दर्शन घडवलं. मंडेलांच्या आयुष्यात शांततेचं पर्व सुरू झालं असतानाच त्यांच्या कौटुंबिक आयुष्याला तडे गेले. संघर्षाच्या काळात साथ देणारी त्यांची पत्नी विनी मंडेला यांच्यावर विविध आरोप होऊ लागले. अखेर मंडेलांना विनीची साथ सोडावी लागली.

शांततेच्या नोबेल पुरस्कारासह जगभरातले अनेक पुरस्कार आणि सन्मान त्यांना मिळाले. मंडेलांनी केवळ दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठीच प्रयत्न केले नाहीत तर जगभरातल्या स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा दिला. त्यामुळेच 2009 साली संयुक्त राष्ट्रांनी 18 जुलै हा मंडेलांचा वाढदिवस ‘मंडेला दिवस’ म्हणून पाळण्याची घोषणा केली. अहिंसा हाच न्याय मिळवण्याचा योग्य मार्ग आहे, हे जगाला सिद्ध करून दाखवणार्‍या नेल्सन मंडेलांना आयबीएन लोकमतची आदरांजली.

´ÖÓ›êü»ÖÖ äñÖÖ ÜÖÖêÃÖÖ ÃÖ´Öã¦üÖñÖÖáÖê ÆüÖêŸÖê, ŸñÖÖ ÃÖ´Öã¦üÖñÖÖáñÖÖ ¯Ö¸Óü¯Ö¸êü¯ÖÏ´ÖÖÞÖê Æêü †ÓŸñÖ×¾Ö¬Öß ÆüÖêŸÖÖÆêüŸÖ. äÖÝÖ³Ö¸üÖŸÖ»Öê ÃÖÖ›êüáÖÖ¸ü ÆüäÖÖ¸ü ®ÖêŸÖê ñÖÖÃÖÖšüß ˆ¯Ö×Ã£ÖŸÖ †ÖÆêüŸÖ. ´ÖÓ›êü»ÖÖ ñÖÖÓáÖê äÖã®Öê ×´Ö¡Ö †ÖáÖÔ×²Ö¿Ö¯Ö ›êüÃÖ´ÖÓ›ü ™ãü™æü †Ö×ÞÖ †´Öê׸üÛêúáÖê ´ÖÖäÖß †¬ñÖõÖ ×²Ö»Ö ØŒ»Ö™ü®Ö ÆêüÆüß ˆ¯Ö×Ã£ÖŸÖ †ÖÆêüŸÖ. ŸñÖÖ׿־ÖÖñÖ ÆüäÖÖ¸üÖê ¦ü×õÖÞÖ †Ö×±ÏúÛúß ®ÖÖÝÖ׸üÛú »ÖÖ›üŒñÖÖ ®ÖêŸñÖÖ»ÖÖ †ÜÖê¸üáÖÖ ×®Ö¸üÖê¯Ö ¦êüÞñÖÖÃÖÖšüß äÖ´Ö»Öê †ÖÆêüŸÖ. ¯ÖÏÖ£ÖÔ®ÖÖ, †Öšü¾ÖÞÖß ñÖÖÓ®Öß ¾ÖÖŸÖÖ¾Ö¸üÞÖ ¬Ö߸üÝÖÓ³Ö߸ü ðÖÖ»ÖÓñÖ. ñÖÖ®ÖÓŸÖ¸ü ´ÖÓ›êü»ÖÖÓáñÖÖ äÖ¾ÖôûáñÖÖ ÃÖÖ›êüáÖÖ¸ü¿Öê »ÖÖêÛúÖÓáñÖÖ ÃÖÖõÖß®Öê ŸñÖÖÓáñÖÖ ¯ÖÖÙ£Ö¾ÖÖáÖÓ ¦ü±ú®Ö Ûêú»ÖÓ äÖÖÞÖÖ¸ü †ÖÆêü.

close