केंद्रीयमंत्री सिसराम ओला यांचे निधन

December 15, 2013 11:11 AM0 commentsViews: 182

BL18_04_SISRAM_1490162g15 डिसेंबर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री सिसराम ओला यांचे आज रविवारी निधन झाले. ओला यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.

पाच वेळा संसदेचे सदस्य राहिलेले ओला यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती.

ओला यांचा 30 जुलै 1927 मध्ये जन्म झाला होता. ते झुंझुनू या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते आठ वेळा विधानसभा आणि पाच वेळा लोकसभेत निवडून आले होते. त्यांना सामाजिक कार्यासाठी 1968 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

close