सोन्याच्या दरात पुन्हा वाढ

February 17, 2009 8:32 AM0 commentsViews: 4

17 फेब्रुवारीबाजारात सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी पंधरा हजारांच्याही वर पोचलाय. एकाच दिवसात तीनशे रुपयांची भाववाढ सोन्यात झालेली दिसत आहे. मल्टि कमॉडिटी एक्स्चेंजमधील सोन्याच्या ट्रेडिंगमध्येही सोन्याचे दर तेजीत आहेत. शेअरमार्केटमधल्या मंदीमुळे आता सोन्यापासून फायदा मिळवण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतोय. तसंच रुपयाच्या तुलनेत डॉलरच्या घसरणा-या दरांमुळे सोन्याच्या भावात तेजी दिसतेय. काही दिवसांपूर्वीच सोन्याच्या दरांनी तेरा हजारांची पातळी ओलांडली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर वाढलेले आहेत.

close