मुख्यमंत्र्यांची मोदींवर टीका

December 15, 2013 2:26 PM0 commentsViews: 203

15 डिसेंबर :मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचं आपलं परखड मत व्यक्त केलंय. गुजरातमध्ये फक्त एकाच पक्षाचं सरकार आहे पण केंद्रातले आगामी सरकारही आघाडीचे असणार आहे. अशा वेळी सर्वांना बरोबर घेऊन चालणं आणि एका मतावर आणणं मोदींना कितपत जमेल याबाबत आपल्या मनात दाट शंका आहे, असं चव्हाण म्हणाले.

भारताची अर्थव्यवस्था , परराष्ट्र धोरण , राम मंदीराचा मुद्दा , कलम 370 , अशा अनेक प्रश्नांवर देशाला नरेंद्र मोदींकडून उत्तरं हवी आहेत. ती देण्याचं नरेंद्र मोदी का टाळतायत असा सवालही चव्हाण यांनी केला. नागपूरात महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींवर ही टीका केली आहे.

close