इंडियन मुजाहिदीनच्या 21 जणांवर चार्जशीट दाखल

February 17, 2009 12:53 PM0 commentsViews: 3

17 फेब्रुवारी, मुंबई सुधाकर कांबळे अहमदाबाद आणि इतर ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांआधी पाठवलेल्या ईमेल बाबत इंडियन मुजाहिद्दीनच्या 21 जणांना अटक झाली होती. या सगळ्यांच्या विरोधात मुंबईतल्या विशेष मोक्का न्यायालयात चार्जशीट दाखल झाली. मुंबईच्या क्राइम ब्रँचनं हे चार्जशीट दाखल केलंय. दहशतवाद्यांनी पोलिसांना खुलं आव्हान द्यायला सुरवात केली होती, बॉम्बस्फोट करण्यापूर्वी पाच मिनिटं आधी ते बॉम्बस्फोट करणार असल्याचा ईमेल पाठवायचे.अहमदाबाद आणि सुरत इथे बॉम्बस्फोट करण्यापूर्वी या दहशतावाद्यांनी मुंबईतून ईमेल पाठवल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएस तसंच मुंबई पोलीसही कामाला लागले होते. या प्रकरणातली पहिली अटक 23 सप्टेंबर 2008 रोजी झाली होती. खालसा कॉलेजच्या पीसीचा आयपी ऍड्रेस हॅक करून बॉम्बस्फोटांचे इमेल पाठवण्यात आले होते. 2 हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे. 27 मार्चला या चार्जशीटची पुढची कारवाई होणार

close