राज्यभरात औषध विक्रेत्यांचा 3 दिवस ‘बंद’

December 16, 2013 11:44 AM0 commentsViews: 507

Image img_208752_medicalstore_240x180.jpg16 डिसेंबर :  दडॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कुठलेही औषध देण्यावर सरकारने बंदी घातले आहे. याचाच विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने आज सोमवार पासून तीन दिवसांचा बंद पुकारला आहे.

दरम्यान, औषध विक्रेत्यांनी ‘बंद’ आंदोलन केल्यास दुकानांवर मेस्माअंर्तगत कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे. मात्र, अशी कोणतीही कारवाई झाली तर जेल भरो आंदोलन करून बेमुदत बंद पुकारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने दिला आहे.

close