बारामतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

December 16, 2013 1:38 PM0 commentsViews: 2087

Image rape_case_mumbai_woman_300x255.jpg16 डिसेंबर : दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना अजूनही कमी झालेल्या नाही आहेत. आज बारामतीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर या मुलीने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पीडित मुलगी 95 टक्के भाजली असून तिच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बारामती तालुक्यात तांदुळवाडी येथे 14 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना समोर आली असून पीडित मुलीने स्वत:ला जाळून घेतले आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार सुरेंद्र काजळे याच्यावर बलात्काराचा आरोप असून तो फरार आहे. याविषयी वाच्यता केली तर कुटुंबाला ठार मारू अशी धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली होती. त्यानंतर निराश झालेल्या या पीडित मुलीने स्वत:ला जाळून घेतल्याचे समजते.

ही घटना 10 डिसेंबर रोजी घडली आहे, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी संभाजी कदम यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आला आहे.

close