जस्टिस गांगुलींच्या अडचणीत वाढ

December 16, 2013 2:09 PM0 commentsViews: 457

b9df20d0-f415-4b63-b163-f7f4f9c7eb74HiRes16 डिसेंबर : इंटर्न मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात जस्टिस ए. के. गांगुली आणखी अडचणीत आले आहेत. ऍडिशनल सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंह यांनी इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रात पीडित मुलीने दिलेले प्रतिज्ञापत्र उघड केले आहे. गांगुलींनी आपल्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचे सुचवले, असा आरोप पीडित मुलीने केला आहे.

मागच्या महिन्यात 12 नोव्हेंबर रोजी ए.के.गांगुली यांच्यावर एका इंटर्न वकील तरुणीने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता यामुळे एकच खळबळ उडाली होती. कोलकात्याच्या नॅशनल युनिवर्सिटी ऑफ ज्युडिशिअल सायन्समध्ये लॉ शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने आपल्या ब्लॉगमध्ये हा गंभीर आरोप केला होता. या आरोपाची गंभीर दखल घेत भारताचे ऍटोर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टाने यात लक्ष घालावं अशी विनंती केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 3 न्यायाधीशांची एक चौकशी समिती स्थापन केलीय. यात जस्टिस आर. एम. लोढा, जस्टिस एच. एल. दत्तू आणि जस्टिस राजनाथ देसाई यांचा समावेश आहे. या समितीने सादर केलेल्या अहवालात गांगुली यांना दोषी ठरवण्यात आलं.

पीडित मुलीचा आरोप

“न्यायमूर्ती गांगुलींनी मला सांगितलं की वेगळ्या खोलीची सोय कदाचित होऊ शकणार नाही. मी त्यांच्याबरोबर एका खोलीत राहू शकेन का, असं त्यांनी मला विचारलं. जेवत असताना त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांना मदत केल्याबद्दल आभार मानले. मी दूर झाले आणि हे स्पष्ट केलं की हा शारीरिक संपर्क मला आवडलेला नाही आणि त्यांची वर्तणूक बरोबर नाही. पण त्यांनी माझ्या पाठीवरून हात काढला नाही आणि मला मिठी मारायला ते पुढे सरसावले. ते माझ्या जवळ आले, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘तू खूप सुंदर आहेस’. मी काही प्रतिक्रिया द्यायच्या आत त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले, ‘तुला माहित आहे ना की मी तुझ्याकडे आकर्षित झालोय. तू विचार करत असशील की हा वृद्ध माणूस दारूच्या नशेत बोलतोय. पण मला तू खरंच आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो.’ जेव्हा मी दूर जायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माझ्या हाताचं चुंबन घेतलं आणि परत म्हणाले की मी तुझ्यावर प्रेम करतो.”
 

close