ओला यांच्या निधनामुळे लोकपाल विधेयक लांबणीवर

December 16, 2013 12:48 PM0 commentsViews: 461

parliament_23121116 डिसेंबर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री सिसराम ओला यांचे रविवारी निधन झाले. त्यामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत ओला यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सिसराम ओला यांचे रविवारी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. ओला पाच वेळा संसदेचे सदस्य राहिले असून ते आठ वेळा विधानसभा आणि पाच वेळा लोकसभेत निवडून आले होते. त्यांना सामाजिक कार्यासाठी 1968 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राज्यसभेत लोकपाल विधेयकावर चर्चा आणि त्याची मंजुरी आता एक दिवसाने लांबली आहे, तर सरकारी लोकपाल विधेयकाबद्दल समाधान व्यक्त करणार्‍या अण्णांचे ही उपोषण एका दिवसाने लांबले आहे. लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व पक्षांना विनंती केली आहे. त्यावर मंगळवारी राज्यसभेत आणि बुधवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता असल्याचं काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी सांगितले आहे.

close