अण्णांची प्रकृती खालावली

December 16, 2013 3:39 PM0 commentsViews: 872

anna news3416 डिसेंबर : लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. अण्णांची प्रकृती खालावत चालली असून त्यांचं वजन 4 किलो 300 ग्रॅमनं घटलंय. अण्णांची तब्येत खालावत असल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय.

अण्णांची प्रकृती लक्षात घेऊन ससून रूग्णालयातर्फे यादवबाबा मंदिरात इमर्जन्सी कक्ष उभारण्यात आला आहे. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सिस राम ओला यांच्या निधनामुळे आज संसदेचं कामकाज होणार नाहीय. त्यामुळे अण्णांचं आंदोलन एका दिवसानं लांबलंय.

अण्णांनी सरकारी लोकपाल विधेयकबाबत समाधानी असल्याचं स्पष्ट केलंय. आपण ज्या सूचना केल्या होत्या त्यातल्या बहुतांश सूचनांचा समावेश लोकपाल विधेयकात आहेत. राज्यसभेत लोकपाल विधेयक मंजूर झाल्यावर आपण उपोषण सोडणार असंही अण्णांनी जाहीर केलं आहे. आता उद्या राज्यसभेत लोकपाल विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे.

close