गडकरींविरुद्ध अंजली दमानिया रिंगणात?

December 16, 2013 5:24 PM1 commentViews: 1934

damania vs gadkari16 डिसेंबर : दिल्लीतल्या यशानंतर आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातही जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पुर्ती साखर कारखान्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार्‍या अंजली दमानिया नागपुरातून गडकरींविरूद्ध उभ्या राहण्याची शक्यता आहे.

दिल्लीच्या विजयानंतर ‘आप’ने मुंबईत बिर्‍हाड हलवले आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ‘आप’ मोर्चेबांधणीच्या कामाला लागली आहे. मागील शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत अंजली दमानिया यांना नागपुरातून उमेदवारी देण्यावर चर्चा झाली.

पक्ष नेतृत्वांने याबाबत मला विचारणा केली पण अजूनही यावर निर्णय झाला नाही. आमचा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा आहे जर उद्या पक्षाने जर माझ्यावर जबाबदारी टाकली तर आपण त्याला सामोरं जाऊ आणि जागा लढवू असे संकेत दमानिया यांनी दिले. यापूर्वी जलसंपदा खात्याचे माजी अभियंते विजय पांढरे यांनी नाशिकमधून छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलीये.

  • NATHU

    anjali damaniya yanchi depossit 100/ jama honar.

close