वाघांचा शिकारी रणजित सिंग गजाआड

December 16, 2013 9:42 PM0 commentsViews: 604

tigar shikari16 डिसेंबर : महाराष्ट्रात वाघांची शिकार करणारा कुख्यात शिकारी रणजित सिंग याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या वनविभागानं रणजितसिंगला आंध्रप्रदेशमधून अटक केलीय.

रणजितसिंगला आता आंध्रमधून नागपूरमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या वन विभागाला हे मोठं यश मिळाल्याचं मानलं जातंय. यापूर्वी रणजिंतसिंगला अटक करण्यात आली होती. पण नंतर त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर रणजितसिंग वॉन्टेड होता.

सध्या तिहार जेलमध्ये असलेला कुख्यात शिकारी संसारचंद याचा तो जवळचा साथीदार आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारीमध्ये रणजितसिंगचा हात होता, असं वनाधिकार्‍यांनी सांगितलं.

close