विधानसभेबाहेर घोषणाबाजी

December 16, 2013 10:11 PM0 commentsViews: 158

16 डिसेंबर : विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. कलंकित मंत्र्यांवर न्यायालयात खटला चालवण्यास मुख्यमंत्री परवानगी देत नाहीत, मुख्यमंत्र्यांनी फाईल दडवून ठेवलीय असा आरोप विरोध पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. कंलंकित मंत्र्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी गोंधळ घातला, अखेर विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेबाहेरही जोरदार घोषणाबाजी केली.

close