मुलानेच केली संध्या सिंग यांची हत्या

December 16, 2013 11:06 PM0 commentsViews: 1811

Image sandhya_singh_34q_300x255.jpg16 डिसेंबर : संगितकार जतीन-ललीत यांची बहीण संध्या सिंग यांच्या हत्येप्रकरणाचं वर्षभरानंतर गुढ उकलले आहे. संध्या सिंग यांच्या मुलगा रघुवीर सिंग यानेच हत्या केल्याचं उघड झालंय. संध्या सिंग यांचा मुलगा रघूवीर सिंग पोलिसांना शरण आलाय. एका वर्षापुर्वी नेरूळ पामबीचजवळ संध्या सिंग यांच्या हाडांचा सापळा सापडला होता. अखेर वर्षभरानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय.

नेरुळच्या याच एनआरआय कॉलनीत संध्या सिंग आपला मुलगा रघुवीर सोबत राहात होत्या. नेरुळ स्टेशनसमोरच्या या अभ्युदय बँकेत 13 डिसेंबर 2012 रोजी संध्या सिंग यांना, त्यांची मैत्रीण ऊमा गौर यांनी सोडलं. पण त्यानंतर तब्बल 49 दिवस संध्या सिंग बेपत्ता होत्या. अखेर त्यांचा सांगाडा त्यांच्या घराजवळील खाडीच्या काठाशी सापडला.

संध्या सिंग अभिनेत्री सुलक्षणा आणि विजयता पंडित यांची मोठी बहीण. बँकेत गेलेल्या संध्या सिंग या रिक्षातून उलवा गावात गेल्याचं तपासात उघड झालंय. संध्या सिंग यांच्या मोबाईल लोकेशनवरून त्या करवा आणि उलवा या दोन विरुद्ध दिशेला असणार्‍या गावांत गेल्याचं निष्पन्न झालं होतं. मात्र पण हा प्रवास त्यांचा होता की त्यांच्या मोबाईलचा याचाही पोलिसांना शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरुनही काही हाती लागले नाही. दरम्यान, संध्या सिंग आणि त्यांचा मुलगा रघुवीर यांच्यात वाद होता अशी माहिती पोलिसांना कळाली. त्यानंतर रघुवीर फरार झाला. त्याने कोर्टातही अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली पण त्याला दिलासा मिळाला नाही. अखेर वर्षभरानंतर रघुवीर सिंग स्वत: पोलिसांना शरण आला.

close