सीनिअर केजीमधल्या मुलावर लैंगिक अत्याचार

December 17, 2013 12:16 PM0 commentsViews: 1982

Image img_221332_mumbairapecase_240x180.jpg17 डिसेंबर : ठाण्यातल्या सरस्वती विद्यालयात सीनिअर केजीमध्ये शिकणार्‍या एका मुलावर शाळेतल्याच शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपी मल्लेशला अटक केली. कलम 377 नुसार बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई क रण्यात आली आहे.

राबोडी परिसरातील सरस्वती विद्यालय या नामवंत शाळेत ही घटना घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पीडित मुलगा शाळेत आल्यावर त्याला प्रसाधनगृहात नेऊन मल्लेशने हे कृत्य केले. मल्लेश सोनावणे गेल्या 22 वर्षांपासून शाळे शिपाई म्हणून काम करत होता.

पीडित मुलगा जेव्हा घरी गेला तेव्हा पालकांच्या ही घटना लक्षात आली. पालकांनी ताबडतोब पोलिसांत तक्रार नोंदवली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपी मल्लेशला अटक केली.

close