भारतात अमेरिकन अधिकार्‍यांचे ID कार्ड काढून घेणार

December 17, 2013 4:50 PM1 commentViews: 2776

devayani khobragade17 डिसेंबर :अमेरिकेत देवयानी खोब्रागडे यांना झालेली अटक आणि त्यांची घेण्यात आलेली झडती याविषयी भारताने कठोर भूमिका घेतलीय. मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकात्यातल्या अमेरिकन अधिकार्‍यांना त्यांना विशेष सुविधा देणारी आयकार्ड्स परत देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अमेरिकेच्या भारतातल्या अधिकार्‍यांच्या हक्कांवर भारताकडून निर्बंध आणण्यात येणार आहेत.

देवायानी खोब्रागडे यांना व्हिसासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा आरोप ठेवून अटक करण्यात आली होती. देवयानी यांना अटक केल्यामुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज मंगळवारी या प्रकरणी नवीन माहिती समोर आली. देवयानी खोब्रागडे यांना नुसतीच चारचौघांत अटक करण्यात आली नाही, तर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आल्यावर त्यांचे कपडे उतरवून झडतीही घेण्यात आली.

तसंच बलात्कार, लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींसोबत त्यांना ठेवण्यात आलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्या भारतीय अधिकार्‍याला अशा प्रकारची वागणूक दिल्यामुळे भारताने अमेरिकन अधिकार्‍यांना लगाम घातलाय. अमेरिकन अधिकार्‍यांना भेटीसाठी देण्यात आलेले विशेष आयकार्ड परत घेण्यात येणार आहे.

राजकीय पक्षांनी देवयानी खोब्रागडेंच्या अटकेचा निषेध म्हणून भारतात आलेल्या अमेरिकन शिष्टमंडळाची भेट घ्यायला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी नकार दिलाय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनीही ही भेट रद्द केलीय. या सोबतच या शिष्टमंडळाची कुणीही भेट न घेण्याचे आदेश मंत्र्यांना देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या शिष्टमंडळासमोर सोमवारी सलमान खुर्शीद यांनी हा विषय मांडला होता. पण लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार आणि नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायजर शिवशंकर मेनन यांनी मात्र या शिष्टमंडळाची भेट घ्यायला नकार दिला होता. देवयानी खोब्रागडेंना अटक करताना नेहमीच्या पद्धती पाळण्यात आल्या होत्या असं अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटचं म्हणणं आहे.

  • Anonymous

    Bharatiy netyanmadhe dum asal asta na tar aataparynt yaa US cha aagau aani faltu lokanchi band wajali asti….. Sagale saale selfish aani phattu….he sagala asach chlu rahnaar ahe… Hopeless

close