हे क्रांतीकारक पाऊल -अण्णा

December 17, 2013 6:35 PM1 commentViews: 1078

lokpal bill pass news and anna

========================================

लोकसभेत मंजुरीनंतर उपोषण सोडणार

========================================

17 डिसेंबर : लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर झालं हे एक क्रांतीकारक पाऊल आहे उद्या लोकसभेत ही हे पाऊल पडले. असं सांगत अण्णांनी उद्या लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं. तसंच समाजवादी पक्ष सोडून राज्यसभेतील सदस्यांनी ‘लोकपाल’ला पाठिंबा दिला त्याबद्दल अण्णांनी जनतेच्या वतीने राज्यसभेच्या सदस्यांचे आभार मानले. उद्या लोकसभेत लोकपाल मंजूर होईल असा विश्वासही अण्णांनी व्यक्त केला.

देशभरात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्रातील एका छोट्याशा राळेगणसिद्धी या गावातील अण्णा हजारे यांनी एक आंदोलन पुकारले. बघता बघता या आंदोलनाने देशव्यापी रुप घेतले. भ्रष्टाचाराला वैतागलेला सर्वसामान्य माणूस ”मैं अण्णा हुँ’ असं म्हणत रस्त्यावर उतरला. आणि भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाची मागणी रेटून धरली. यासाठी अण्णांनी या अगोदर तीन वेळा उपोषणं केली. देशभरात लोकपालचा प्रचार केला. अखेर त्यांच्या या लढ्याला आज यश आलं.

यावेळी अण्णा म्हणाले, देशातील जनता भ्रष्टाचाराला वैतागली आहे. भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की, त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालंय. भ्रष्टाचारामुळे देशाचा विकास खुंटला असून महागाई वाढली आहे. याचा विचार करुन देशातील जनतेनं हे आंदोलन उभं केलं. अखेर या जनतेचा आवाज सत्तेत बसलेल्या लोकांना ऐकावा लागला. लोकपाल विधेयक ही अण्णांची मागणी नाही तर जनतेची मागणी आहे. अण्णा हजारे एक फकीर माणूस असून त्याला काहीही लागत नाही. जे हवंय ते जनतेसाठी हवंय अशी भावना अण्णांनी व्यक्त केली.

तसंच अण्णांनी राज्यसभेतील सदस्यांचे आभार मानले. देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी उद्या लोकसभेतील सदस्यांनी लोकपालला पाठिंबा द्यावा आणि मंजुरी द्यावी अशी विनंतीही अण्णांनी केली. तसंच लोकपालमुळे 100 टक्के भ्रष्टाचाराला ब्रेक लागणार नाही पण कमीत कमी 40 ते 50 टक्के भ्रष्टाचार कमी होईल असा दावाही अण्णांनी केला.

  • Sham Dhumal

    “जनलोकपाल बील” कॉंन्ग्रेस सरकार पास करणार नाही याची खात्री होती.
    “कमजोर लोकपाल” तरी पास केले तेही ठीक म्हणावे लागेल.

close