कलंकित मंत्र्यांवरुन विरोधकांचा गदारोळ

December 17, 2013 8:53 PM0 commentsViews: 387

mantri17 डिसेंबर : कलंकित मंत्र्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ घातला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज मंगळवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय.

कलंकित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत विरोधी पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन गदारोळ घातला. पण सरकारनं काम रेटून नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर विरोधकांनी विधानभवन परिसरातही जोरदार घोषणाबाजी केली.

सभागृहाच्या इमारतीला प्रदक्षिणा घालत विरोधकांनी नारायण राणे आणि गुलाबराव देवकर यांच्याविरोधात घोषणा दिल्या. पण या गदारोळातच सरकारनं काही विधेयकं मंजूरही करून घेतली आहे.

close