संसदेची दोन्ही सभागृहे पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित

December 18, 2013 8:02 PM0 commentsViews: 499

Image img_99922_sansad_240x180.jpg18 डिसेंबर :  संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बुधवारी पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज तात्काळ थांबवण्यात आले. तर भारत-बांगलादेश सीमाप्रश्नाबाबत विधेयक मांडल्यानंतर प्रचंड गदारोळ झाल्यामुळे राज्यसभेचे कामकाज थांबवण्यात आले.

लोकसभेत आणि राज्यसभेतही अनेक महत्त्वाची विधेयकं चर्चेसाठी येणे अपेक्षित होते. यामध्ये जातीय हिंसाचारविरोधी विधेयक, विमा खात्यातील सुधारणांचे विधेयक, महिला आरक्षणाचे विधेयक अशी अनेक बिलं मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पण, त्याआधीच संसद पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आली.

पंधराव्या लोकसभेचे हे एका अर्थाने शेवटचे पूर्ण अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे. कारण यापुढचे अधिवेशन जेव्हा असेल तेव्हा कदाचित लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असेल आणि त्यामुळे त्या अधिवेशनात देशाचे अंतरिम बजेट पास करून घेण्यापलीकडे काहीच होणार नाही. यामुळेच या अधिवेशनाचे कामकाज वाढवावे, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली.

close