ओसामाचा ठावठिकाणा लागला ?

February 17, 2009 5:19 PM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी ओसामा बिन लादेन याचा ठावठिकाणा लागल्याची शक्यता आहे. लॉस एंजेलिसमधल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या जिओग्राफर्सनी ओसामाच्या लपण्याचं ठिकाण माहीत झाल्याचा दावा केलाय. पाकिस्तानातल्या वायव्य सरहद्द प्रांतातल्या पाराचिनार शहरात तो लपल्याचं समजतंय. पाराचिनारमधल्या तीनपैकी एका इमारतीत ओसामा असण्याची शक्यता आहे. पाराचिनार अफगाणिस्तानच्या सीमेपासून केवळ 12 किलोमीटर अंतरावर आहे. पेशावरपासून तर हे शहर खूपच जवळ आहे. सॅटेलाईटनं घेतलेले फोटो आणि भूगोलातली मूलभूत तत्त्वं यांच्या साहाय्यानं शास्त्रज्ञांनी ओसामाच्या ठावठिकाण्याचा निष्कर्ष काढलाय. अमेरिका सरकारची अधिकृत प्रतिक्रिया मात्र यावर अजून मिळाली नाहीय.

close