IBN लोकमत इम्पॅक्ट – पूनम धुरगुडेंना बढती

December 19, 2013 4:30 PM2 commentsViews: 4221

19 डिसेंबर : 26/11 च्या शहिदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी मागच्या महिन्यात आयबीएन-लोकमतने शहीद वीरांना हा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमात शहीद बापुराव धुरगुडे यांच्या मुलीनं आपल्या बहिणीला राज्य सरकारने नियमांप्रमाणे क्लास 1 ची नोकरी न देता क्लास 3 ची नोकरी दिली अशी कैफीयत मांडली आणि न्याय देण्याची मागणी केली.

गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी याची दखल घेत पाठपुरावा केला आणि सरकारी नियमांना अपवाद करत पूनम धुरगुडे हिला क्लास 1 दर्जाची नोकरी देण्याचे आदेश काढलेत आणि शहीदांच्या कुटुंबियांसाठी सरकार संवेदनशील असल्याचं दाखवून दिले आहे.

  • Subhash Jagtap Yuva Manch

    राज्य शासनाच्या संवेदनशीलपणाचा हा खरचं एक चांगला पुरावा व उदा. आहे.

  • Jayant Sonawane

    great niyamaa pekshaa tyaag motha

close