अखेर कॅप्टन सुनील जेम्स यांची सुटका

December 19, 2013 1:41 PM0 commentsViews: 295

mumbai_sailor_baby_sunil_james_36019 डिसेंबर : सुमद्री चाच्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली सहा महिन्यांपासून सुनील जेम्स टोगोमध्ये अटकेत असणारे कॅप्टन सुनील जेम्स आणि विजयन यांनी आज सुटका झालीचे परराष्ट्र मंत्रीलयाचे प्रवक्ते सईद अकबरूद्दीन यांनीही माहिती दिली.

 
सुनील जेम्स यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु होते. सुनीलच्या 11 महिन्याच्या मुलाचे 2 डिसेंबरला निधन झाले आणि त्याच्या अंत्यसंस्कारांसाठी सुनीलला येता यावं यासाठी जेम्स कुटुंबाची धडपड सुरू होती. या संदर्भात त्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती .

 

सुनील यांच्यावर झालेला चाचेगिरीचा आरोप खोटा असल्याचेही त्यांनी या वेळी पंतप्रधानांना सांगितले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. अखेर त्यांची सुटका करण्यात येणार आहे. त्यांना जुलै महिन्यात टोगोकडून चाचेगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

close