गरज पडल्यास संशयितांची नार्को टेस्ट करू – जॉईंट सीपी

December 20, 2013 1:40 PM0 commentsViews: 287

narendra dabholkar 320 डिसेंबर : पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासादरम्यान गरज पडली तर संशयितांची नार्को टेस्ट करू, अशी माहिती आज पुण्याचे जॉईंट सीपी संजीव सिंघल यांनी आज दिली. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला आज चार महिने पूर्ण झालेत. मात्र, अजूनही त्यांचे खुनी मोकाट आहेत. त्यांना कधी पकडणार असा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय.

20 ऑगस्टला पुण्यात सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमाराला ओंकारेश्वर मंदिराच्या जवळच्या पुलावर दोन मारेकर्‍यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. खुनाचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे सरकार आणि पोलिसांकडून अनेकदा सांगण्यात आले. मात्र, खुनी अजूनही मोकाट आहेत.

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात सरकारला अपयश आले याचा निषेध करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये मेणबत्ती मोर्चा काढला. डॉ. दाभोलकरांच्या खुन्यांना आणि सूत्रधारांना लवकर अटक करावी, यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला.

close