‘महागर्जना’ रॅलीत मोदी यांचं आगमन

December 22, 2013 1:29 PM0 commentsViews: 1351

modi on rahul new22 डिसेंबर : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचं मुंबईत महागर्जना रॅलीच्या सभास्थळावर आगमन झाले आहे. नुकत्याच भाजपने चार राज्यांच्या निवडणुका गाजवल्यानंतर, मोदींची ही दुसरीच सभा आहे. या सभेसाठी मुंबई भाजपतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ही सभा होत आहे. मोदींना असलेला धोका लक्षात घेता त्यांच्यासाठी सात स्तरांची सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

मोदींची ही सभा अनोखी आणि विक्रमी व्हावी यासाठी भाजपने कुठलीही कसर सोडलेली नाही. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभास्थानावर येत आहेत. सभेसाठी सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर करण्यात आला आहे. सभेसाठी मुंबईतल्या काही हजार चहावाल्यांना खास निमंत्रण देण्यात आले आहे तर बाहेरून येणार्‍या कार्यकर्त्यांच्या भोजन आणि न्याहारीसाठी खास गुजराती थेपल्यांची पाच लाख पाकिटं तयार करण्यात आली आहेत.

मोदींच्या मुंबईतल्या सभेसाठी 50 हून अधिक देशांच्या राजदूतांना निमंत्रण देण्यात आले आहे मात्र देवयानी खोब्रागडे अपमानप्रकरणी भाजपने अमेरिकेचा निषेध नोंदवत नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून अमेरिकन राजदूतांना देण्यात आलेले निमंत्रण मागे घेतले आहे.

close