स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉयीज असोसिएशनचे कर्मचारी संपावर

February 17, 2009 5:51 PM0 commentsViews: 1

17 फेब्रुवारी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होणारं विलिनिकरण मान्य नसल्यामुळे स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉयीज असोसिएशनच्या कर्मचार्‍यांनी आजपासून संप पुकारलाय. मुंबईत आझाद मैदानावर हे कर्मचारी निदर्शन करणारेत. यात स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, म्हैसूर, जयपूर, हैद्राबाद, बिकानेर, इंदोर आणि स्टेट बँक ऑफ पतियाळाचे कर्मचारी सामील आहेत. या एक दिवसांच्या संपात सुमारे 50 हजार कर्मचार्‍यांचा सहभाग आहे. एसबीआयच्या कर्मचार्‍यांना मिळणारे फायदे इतर संलग्न बँकांच्या कर्मचार्‍यांना मिळत नसल्याचा आरोपही स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉयीज असोसिएशनच्या कर्मचार्‍यांनी केलाय.

close