मोदी यांचा मेणाचा पुतळा !

December 22, 2013 2:11 PM0 commentsViews: 1089

modi22 डिसेंबर : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मेणाचा पुतळा बनवण्यात आलाय. अण्णा हजारे यांचा मेणाचा पुतळा बनवणारे कलाकार संदीप कोंडुलू यांनी हा पुतळा बनवलाय. स्वत: नरेंद्र मोदींनी या पुतळ्याचं अनावरण केलं. आपल्या अपेक्षेपेक्षाही हा पुतळा चांगला झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

या वेळी भाजरचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग देखील उपस्थित होते. आता हा पुतळा कोंडुलू यांच्या लोणावळ्यातल्या संग्रहालायत ठेवण्यात येणार आहे.

मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भव्य मैदानात होणाऱ्या ‘महागर्जना’ सभेसाठी मोदी यांचे आगमन झाले आहे. या सभेसाठी मुंबई भाजपतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींना असलेला धोका लक्षात घेता त्यांच्यासाठी सात स्तरांची सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

 

close