ढाक्यात रंगणार 2011चा वर्ल्ड कप

February 17, 2009 5:56 PM0 commentsViews: 3

17 फेब्रुवारी 2011चा वर्ल्ड कप भारतीय उपखंडातच होईल अशी घोषणा आयसीसीनं केली. दिल्लीत झालेल्या भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेशच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत आयसीसीनं या यजमान देशांना गरज पडल्यास सामन्यांची स्थळं बदलण्यासाठी पर्यायी जागांचा विचार करण्याचं सुचवलंय. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारत पाकिस्तान यांच्यातले संबंध बिघडल्यामुळे वर्ल्डकपवर प्रश्नचिन्हं निर्माण झालं होतं. आणि कदाचित वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया किंवा न्युझीलंडला हलवण्यात येणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या..पण ही स्पर्धा भारतीय उपखंडातच होणार हे आता स्पष्ट झालंय त्याचा उद्घाटन सोहोळा 19 फेब्रुवारी 2011ला ढाका इथे पार पडेल. तर दोन सेमी फायनल्स श्रीलंका आणि पाकिस्तानात होतील तर वर्ल्ड कप फायनल भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 49 मॅचेस खेळल्या जाणार आहेत आणि ही स्पर्धा जास्तीत जास्त 6 आठवडे चालेल.

close