रेल्वे प्रवास सोयीचा!

December 22, 2013 1:42 PM0 commentsViews: 423

Image img_194052_kokantrain_240x180.jpg22 डिसेंबर : रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्ही प्रवासाचा बेत आखला असेल आणि काही कारणांमुळे तो तुम्हाला रद्द करायचा असेल तरीही काळजीचं कारण नाही. कारण तुमच्या त्याच तिकीटावर तुमच्याच कुटुंबातले इतर सदस्य प्रवास करू शकतील. रेल्वेच्या या नव्या सुविधेचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. त्यासाठी रेल्वेने काही नियम घातले आहेत.

जी व्यक्ती त्या तिकीटावर प्रवास करणार असेल तिचे नाव रेशनकार्डवर असणं आवश्यक आहे. यासाठी 24 तास आधी अर्ज करून तुम्हाला नवे तिकीट काढावं लागणार आहे.

पण या योजनेमुळे तुमचा रेल्वे प्रवास नक्कीच सुखाचा होईल यात काहीच शंका नाही.

close