सलमानचा वीर सिनेमा वादाच्या भोव-यात

February 17, 2009 6:04 PM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी आता आणखी एका हिंदी सिनेमावरून वाद सुरू झालाय. हा सिनेमा आहे सलमान खानचा वीर. वीरच्या शूटिंगदरम्यान राजस्थानातल्या अमेर किल्ल्यातली भिंत पडली होती. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री अंबिका सोनी यांनी दिलेत. या प्रकरणी अमेर किल्ला प्रशासनानं सिनेमाचे निर्माता आणि दिग्दर्शक यांच्याविरुद्ध तक्रारही दाखल केलीय. राजस्थान सरकारनंही कोर्टाकडून एक नोटीस बजावलीय. आणि ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षंणासाठी असलेल्या नियमांचं उल्लंघन का झालं, याचं स्पष्टीकरण मागितलंय. हायकोर्टाच्या आदेशानुसार या सिनेमाचं शूटिंग सध्या थांबवण्यात आलंय.

close