आरपीआयच्या उमेदवाराचं घर पेटवलं

December 22, 2013 12:45 PM0 commentsViews: 367

Image img_191392_pandharpuraag.transfers_240x180.jpg22 डिसेंबर : रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातल्या थळ या गावात ग्रामपंचायत निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराचं घर पेटवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटे ही घटना घडकीस आली. बाबू डिगी असे या पीडित उमेदवाराचे नाव असून तो आरपीआयचा उमेदवार आहे. डिगी यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव होता. पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते.

आज पहाटे काही अज्ञात व्यक्तींनी डिगींच्या घराच्या दरवाजावर रॉकेल ओतून आग लावली. या आगीमुळे त्यांची आई झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर शेजार्‍यांनी आग आटोक्यात आणली. या प्रकरणी अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच या उमेदवाराला आणि आरपीआय तालुका अध्यक्षाला मारहाण केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेंद्र दळवी यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय.

close