राज ठाकरे आणि बिग बी येणार एकत्र

December 23, 2013 3:25 PM0 commentsViews: 629

amit-raj23 डिसेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. राज ठाकरेंनी बच्चन कुटुंबावर टीका केल्यानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र दिसणार आहेत. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात मनसे चित्रपट सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

बिग बी 2008 मध्ये उत्तर प्रदेशचे ब्रँड ऍम्बेसेडर झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे बच्चन कुटुंब आणि राज ठाकरे यांचे संबंध बिघडले होते. पण आता कमी झाल्याचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसतंय.

 

मनसेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात बिग बी यांच्या हस्ते अनोखे स्टंट करणार्‍यांना विम्याचं वितरण केलं जाणार आहे. तसंच भारतीय सिनेसृष्टीचं शतकोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

close