तेजपालच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

December 23, 2013 2:32 PM0 commentsViews: 47

TARUN_TEJPAL_1660121f23 डिसेंबर : लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या तरुण तेजपालची न्यायालयीन कोठडी 12 दिवसांनी म्हणजेच 4 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 26 डिसेंबरला तीही इन-कॅमेरा होणार आहे.

तेजपालला सुनवण्यात आलेली न्यायालीन कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला पणजी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर कोर्टाने त्याची कोठडी 12 दिवसांनी वाढवली. यामुळे तेजपालला नवीन वर्षाचं स्वागत तुरूंगातच करावं लागणार आहे.

तेहलका साप्ताहिकाचे माजी संपादक तरुण तेजपालावर आपल्या सहकारी पत्रकार महिलेचं लैंगिक शोषण के ल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तेजपालला 30 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

close