देवयानींना कोर्टात हजर राहण्याची गरज नाही !

December 23, 2013 4:01 PM0 commentsViews: 585

devyani k23 डिसेंबर : अमेरिकेतील भारताच्या परराष्ट्र अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना व्हिसा घोटाळा प्रकरणात कायदेशीर कारवाईला समोरं जावं लागणार आहे. पण, यातही दिलासादायक बाब म्हणजे त्यांना या खटल्यात व्यक्तीश: हजर रहाण्यापासून सूट मिळाली आहे. देवयानी यांना संयुक्त राष्ट्रांत काम करण्यासाठी यूनोने कायदेशीर मान्यताही दिली. त्यामुळे आता त्यांना राजनैतिक संरक्षणदेखील मिळाले आहे.

दरम्यान, देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधातले आरोप अतिशय गंभीर असून ते मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. आता प्रश्न फक्त कायद्याच्या अंमलबजावणीचा आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मेरी हर्फ यांनी स्पष्ट केलं आहे. भारताने देवयानीविरोधातला व्हिसा घोटाळ्याचा आरोप खोटा असून मागे घ्यावा. तसंच अमेरिकेने माफी मागावी, अशी मागणी केली होती. या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यास देवयानीला 15 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

close