पवारांची घोषणा, लोकसभेसाठी महाडिक इन मंडलिक आऊट !

December 23, 2013 7:11 PM0 commentsViews: 4136

Image sharad_pawar_on_fixing456346_300x255.jpg23 डिसेंबर : लोकसभा निवडणुकांना आता सहा महिन्यांपेक्षा कमी वेळ राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला पवारांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, पवार यांनी महाडिक यांनी कोल्हापूरवर लक्ष केंद्रीत करावे, त्यांना आवश्यक ते पाठबळ देऊ, असं जाहीर केलं आणि उपस्थितांना धक्का दिला. कोल्हापूरमध्ये सदाशिवराव मंडलिक यांचे पवारांशी सलोख्याचे संबंध नाहीत.

राष्ट्रवादीतर्फे निवडणूक जिंकलेल्या मंडलिक यांनी अनेकदा शरद पवारांवर जाहीर टीका केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा करून मंडलिक यांच्यासाठी दरवाजे बंद केल्याचं मानले जात आहे.

close