घरकुल घोटाळ्याप्रकरणी सरकारी वकिलांना कारणे दाखवा नोटीस

December 23, 2013 2:52 PM0 commentsViews: 195

abad coart23 डिसेंबर : जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारी वकिलांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच आपलं म्हणणं 9 जानेवारीपर्यंत मांडण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहे. सरकारी वकिलांना नोटीस ही आमदार सुरेश जैन यांना दिलासा मानला जात आहे.

सुरेश जैन यांच्यावर आरोप निश्चित करताना सरकारच्या परवानगीची गरज आहे की नाही, यावरून सरकारी वकिलांनी दिशाभूल केल्याचा आरोप जैन यांच्या वकिलांनी केला होता.

घरकुल घोटाळ्याप्रकरणी 20 मे 2013 रोजी सरकारी वकिलांनी म्हटलं होतं की, आरोप निश्चित करण्यासाठी सरकारच्या परवानगी गरज नाही. या प्रकरणी माहितीच्या अधिकारातून पुढे आलंय की, त्या वेळी राज्य सरकारने याबद्दल कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे खंडपीठाने याची दखल घेत नोटीस बजावली आहे.

close