कोल्हापुरात गँगवार, तरुणाचा खून

December 23, 2013 6:37 PM0 commentsViews: 556

kolhapur crime23 डिसेंबर : कोल्हापूर शहराजवळ पाचगावमध्ये रविवारी रात्री धनाजी गाडगीळ या तरुणावर धारदार शस्त्रांना हल्ला करण्यात आला यात गाडगीळचा मृत्यू झाला. या हल्लात त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीयुद्धातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

 

या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. पाचगावमध्ये 13 फेब्रुवारीला अशोक पाटील यांचा खून झाला होता, त्याचा संशय हा डीजे म्हणजे दिलीप जाधव यांच्या गँगवर होता. धनाजी गाडगीळ हा दिलीप जाधव यांचा मेहुणा होता, अशोक पाटील यांच्या खुनाचा बदला म्हणून धनाजीचा तलवार आणि गुप्तीनं वार करुन हा खून करण्यात आला. या हल्ल्यामध्ये गाडगीळचा एक मित्रही गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, हा खून अशोक पाटील याच्या मुलांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

close