मनसे-सेनेचा दणका, एचएएल कंपनीत नोकर भरती लांबणीवर

December 23, 2013 7:50 PM0 commentsViews: 823

23 डिसेंबर : नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेनेच्या इशार्‍यानंतर हिंदुस्तान एरोनेटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल (HAL) कंपनीची नोकर भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलीय. नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावं अशी मागणी मनसे आणि शिवसेनेनं केली होती. 300 जागांसाठी ही भरती होतेय. येत्या 29 डिसेंबरला त्यासाठी लेखी परीक्षा होणार होती.

या नोकरी भरती प्रक्रियेत 80 टक्के भरती स्थानिकांमधून करावी आणि परीक्षा मराठीतूनच घ्यावी आणि भरतीत भूमीपुत्रांना डावललं आणि परप्रांतियांना संधी दिली तर मनसे आंदोलन करेल असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार वसंत गीते यांनी दिला होता. मनसे कार्यकर्त्यांनी एचएएलच्या व्यवस्थापकांना भेटून या संबंधी निवेदनही दिलंय. मनसेच्या भूमिकेनंतर शिवसेनेनंही या नोकर भरतीला विरोध करत आंदोलन सुरू केलंय. शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनानंतर एचएएलची भरती प्रक्रिया 15 दिवसांनी लांबणीवर टाकण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतलाय.

close