सेना-भाजप आमने-सामने

December 23, 2013 10:03 PM0 commentsViews: 516

23 डिसेंबर :  ठाणे महापालिकेच्या परिवहन सभापतीच्या निवडणूकीला आज मारहाणीचं गालबोट लागलं. बंडखोरीमुळं ही निवडणूक गेली काही दिवस गाजतेय. आज झालेल्या निवडणूकीत शिवसेनेतून बंडखोरी करून आघाडीच्या गळाला लागलेले उमेदवार शैलेश भगत यांचा विजय झाला. या निवडणूकीत भाजपचे अजय जोशी यांनी आघाडीला मतदान केल्यामुळं आधीच तापलेल्या वादात भर पडली आणि त्याचा परिणाम मारहाणीत झाला. याप्रकरणी नाराज झालेल्या शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना मारहाण केली आणि डांबुनही ठेवलं यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

close