झालं गेलं गंगेला मिळालं – राज ठाकरे

December 23, 2013 10:04 PM0 commentsViews: 2996

Image raj_thakare_300x255.jpg23 डिसेंबर : आमच्यात वैयक्तिक वाद म्हणून वाद नव्हता. अमिताभ बच्चन यांचा सारखा महान अभिनेता होणे नाही. जे झालं ते गंगेत मिळालं असं सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबीयांशी झालेल्या वादावर कायमचा पडदा टाकला.

तसंच अमिताभ बच्चन हे पहिले भारताचे ब्रँड ऍम्बेसेडर आहे. अलाहाबादचे नाही. ते महाराष्ट्रातून मोठे झालेत अलाहाबादचं त्यांच्यावर जितकं प्रेम आहे तितकच महाराष्ट्राचं आहे. जर वाद झाले तर आमची भूमिका तिच राहिन असंही राज यांनी स्पष्ट केलं. मनसेच्या चित्रपट सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात राज ठाकरे आणि बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र आले.

2008 साली बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचे ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून सन्मानित करण्यात आलं. मात्र राज ठाकरे यांनी यावर आक्षेप घेत ‘ठाकरी शैली’त समाचार घेतला. यानंतर जया बच्चन यांनीही ‘में राज ठाकरे को नही जानती’ असं म्हणून वादात आणखी तेलं टाकलं. मात्र तब्बल सहा वर्षानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महानायक अमिताभ बच्चन एकाच व्यासपीठावर आले. मनसेच्या चित्रपट सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पडद्याच्या पाठीमागे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आयुर्विमा योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बिग बींनी मराठीतून भाषण करुन सर्वांची मनं जिंकली. कलाकार खेळाडूंचं आयुष्य सारखंच असतं. खेळाडूंचं वय झाल्यानंतर त्यांना मैदानावर वय साथ देत नाही तसंच आम्हा कलाकारांचंही आहे. मनसे चित्रपट सेनेनं या कर्मचार्‍यांसाठी जे कार्य हाती घेतलं आहे ते मोलाचं असून ते कौतुकास्पद आहे अशी भावना बिग बींनी व्यक्त केली. तसंच अमिताभ बच्चन यांनी राज ठाकरे यांचेही आभार मानले. बिग बींनी आपल्या भाषणानंतर वडील हरीवंश राय बच्चन यांची ‘अग्निपथ’ कविताही सादर केली.

 

त्यानंतर राज ठाकरे भाषणासाठी आले असता माईक खाली करत त्या उंचीवरुन आपल्याला बोलायची सवय नाही असं सांगत भाषणाला सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांनी मनसेच्या कार्यक्रमाला यावं हे अगोदरच ठरलं होतं. हे मलाही माहित नव्हतं. बाळासाहेबांची तब्येत ठीक नव्हती तेव्हा अमिताभ यांची भेट झाली होती. त्यानंतर सचिन तेंडुलकरच्या घरी जेव्हा पार्टी झाली होती तेंव्हाही आमची भेट झाली होती. त्यावेळा आमचं बोलणंही झालं होतं. पण आमच्यात व्यक्तिगत म्हणून असा कोणताही वाद नव्हता. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांच्या सारखे महान कलाकार हे देवाने पाठवलेली आहे. त्यांच्यासारखे कलाकार पुढे होणारही नाही. हिंदी शिकायचं असेल तर अमिताभ यांच्याकडून शिकावे असं म्हणत राज यांनी अमिताभ यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. पण त्याचबरोबर त्यांच्याबरोबर झालेला जो काही वाद झाला तो गंगेला मिळाला. अमिताभ बच्चन हे पहिले भारताचे ब्रँड ऍम्बेसेडर आहे. अलाहाबादचे नाही. ते महाराष्ट्रातून मोठे झालेत अलाहाबादचं त्यांच्यावर जितकं प्रेम आहे तितकच महाराष्ट्राचं आहे. जर वाद झाले तर आमची भूमिका तिच राहिन असंही राज यांनी स्पष्ट केलं.

close