मिलिंद पाटणकर ‘नॉट रिचेबल’

December 24, 2013 3:03 PM0 commentsViews: 782

thane24 डिसेंबर : ठाणे महापालिकेच्या परिवहन सभापतीच्या निवडणुकीत काल शिवसेनेनं केलेल्या राड्यानंतर आज उपमहापौर मिलिंद पाटणकर नॉट रिचेबल झालेत. त्यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिलाय. पाटणकरांना शहराध्यक्षपदाचाही राजीनामा द्यायला सांगितलाय, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. फडणवीस यांनी मिलिंद पाटणकरांची भेट घेतली.

ठाणे परिवहन समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोर शिवसेना उमेदवार निवडून आल्याने शिवसेना-भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काल उपमहापौरांच्या कार्यालयाची मोडतोड केली. या घटनेनंतर उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

परिवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शैलेश भगत विजय झाले. त्यांना समितीचे सदस्य अजय जोशी यांनी मतदान केले, असा आरोप आहे. जोशी हे उपमहापौरांचे समर्थक मानले जातात. निवडणुकीत बंडखोर उमेदवारांचा विजय झाल्याची घोषणा होताच युतीच्या कार्यकर्त्यांनी उपमहापौरांचे कार्यालय गाठले आणि मोडतोड करण्यास सुरवात केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याशी समझोता करून युतीच्या उमेदवाराचा पराजय केला, असा आरोप पाटणकर यांच्यावर केला आहे.

काल उपमहापौरांच्या कार्यालयात झालेल्या तोडफोडप्रकरणी महानगरपालिकेनं अज्ञात व्यक्तींविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

close