लैंगिक शोषण: ए.के.गांगुलींची यांच्याविरोधात पोलिस तक्रार?

December 24, 2013 3:50 PM0 commentsViews: 76

ganguly360x27024 डिसेंबर: लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टातले माजी न्यायाधीश ए.के.गांगुलींची यांच्याविरोधात पोलिस तक्रार करण्याचे संकेत या महिला प्रशिक्षणार्थीने आज दिले. गांगुली यांच्यावर एका इंटर्न मुलीने लैंगिक अत्याचारा झाल्याचा आरोप केला आहे.

गांगुली यांनी यासंदर्भात सरन्यायाधीश पी. सदासिवम यांना पत्र लिहिले होते. ‘आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना दिलेल्या निर्णयांमुळे आपल्याविरोधात ही मोहिम चालविली जात असल्याचा’ आरोप त्यांनी या पत्रामध्ये केला होता. या पार्श्‍वभूमीवर या महिला प्रशिक्षणार्थीने गांगुली यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचे ध्वनित केले.

लैंगिक शोषणाचा आरोप खोटा असल्याच्या विधानामुळे केवळ आपलाच नव्हे; तर सर्वोच्च न्यायालयाचाही अपमान होत असल्याचा दावा या प्रशिक्षणार्थीने यावेळी केला. “या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी आत्तापर्यंत अत्यंत जबाबदारीने पावले उचलली आहेत,” असे या प्रशिक्षणार्थीने यावेळी सांगितले. प. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल पक्षाने गांगुली यांना हटविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याबरोबरच केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनीही या मागणीस पाठिंबा दर्शविला आहे.

close